loader
Breaking News
Breaking News
Foto

पाकिस्तानचे धाबे दणाणले,तालिबानी थेट इस्लामाबादपर्यंत! पाकची १९ ठाणी तालिबानकडे,जिवंत सैनिकांनाही पकडले

इस्लामाबाद, २८ फेब्रु. (वृत्तसंस्था) - ‘‘जीवावर उदार तो हजारांस भारी’’ ही म्हण आज अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने सिध्द करुन दाखवली. पाकिस्तानने अफगाणिस्तान विरुध्द युध्द पुकारले आणि अफगाणिस्तानातील काबूलसह अनेक शहरांवर बेछूट हवाई हल्ले करुन प्रचंड बॉम्बफेक केली. अफगाणिस्तानकडे पुरेशी विमाने नाहीत व हवाई दल देखील नाही.. परंतु त्यांचे तालिबानी मात्र सदैव जीवावर उदार. त्यांनी पाकिस्तानवर एकामागोमाग एक असे काही हल्ले चढवले की पाकिस्तानची त्रेधा तिरपीट उडाली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या पंतप्रधान शरीफ यांच्या थेट ऑफीसजवळ तालिबानींचा छोटा आत्मघाती ड्रोन येऊन धडकला आणि पाकिस्तानी सैन्याची झोप उडाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इस्लामाबाद परिसरात कडेकोट ‘हवाई सुरक्षा कवच’ कार्यरत असूनही तेथे तालिबानी ड्रोननी प्रवेश केला आणि चुणूक दाखवून दिली. केवळ २४ तासात तालिबानी सैन्याने पाकिस्तानच्या सुमारे १९ लष्करी चौक्यांवर कब्जा मिळवला असून सुमारे ५५ पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले.. म्हणजेच ‘जो जीवावर उदार तो हजारांस भारी’ हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले! पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील युध्द सुरु होऊन २ दिवस झाले. अफगाणिस्तानवर अचानक पाकिस्तानने हवाई हल्ले चढवून तुफान बॉम्बफेक केली व या युध्दाला तोंड फुटले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg