loader
Breaking News
Breaking News
Foto

इराणी सैनिकांनी त्वरीत आत्मसमर्पण करावे अन्यथा मरणाला सामोरे जावे हे उत्तम! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा

इराण विरुध्द भयंकर युध्दाला सुरुवात झाली. काही झालं तरी इराणला अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनू देणार नाही असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्धार आहे. त्यामुळे प्रथम इस्त्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल आणि त्याचा उपसर्ग अमेरिकेलाही होईल. त्यामुळे ही लढाई अमेरिकेसाठी अनिवार्य बनली होती. त्याशिवाय इराणच्या बॅलेस्टीक मिसाईलची वाढत जाणारी ताकद हेसुध्दा त्यांच्यावर हल्ला करण्यामागचं अजून एक कारण आहे. जून २०२५ मध्ये अमेरिकेने इराणवर हल्ला चढविला त्यावेळी इराणी क्षेपणास्त्रांची ताकद दिसून आली. म्हणून इराणला रोखणं ही इस्त्रायल व अमेरिकेची मजबुरी बनली होती. या परिस्थितीत इराणमध्ये सत्ताबदल घडवायचा असा इस्त्रायल व अमेरिकेचा निर्धार आहे. तेथे अमेरिका व इस्त्रायलला अनुकूल सरकार येत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेला संबोधित करताना इराणला इशारा दिला. त्यांनी सांगितले, ‘‘इराणी सैन्याने त्वरीत आत्मसमर्पण करावे. जर इराणी सैनिकांनी आत्मसमर्पण केले तर त्यांना चांगली वागणूक देऊ, सुरक्षा देऊ, पण नकार दिला तर मृत्यू अटळ आहे.’’ त्यामुळे आज रात्री इराणमध्ये सर्वच ठिकाणी प्रचंड बॉम्ब वर्षाव होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज रात्री काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg