loader
Breaking News
Breaking News
Foto

पाकची १९ ठाणी जिंकली, हात पाकच्या गळ्यापर्यंत!

पाकिस्तानी व तालिबानी सैन्यात दंगम जिल्ह्यातील बांशी परिसरात जोरदार चकमकी सुरु आहेत. पाकिस्तानी मिलिटरी तेथून माघार घेत आहे. अफगाणिस्तानने नवपास चौकी ताब्यात घेतली असून तेथे २ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह पडून आहेत. आणखी काही कारवायांमध्ये अफगाणिस्तानच्या तालिबानी सैनिकांनी ड्युरंड रेषेवरील सुमारे १९ पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या असून तेथून मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रे त्यांनी हस्तगत केली आहेत. एवढेच नव्हे तर अनेक पाकिस्तानी सैनिकांना तालिबानी सैनिकांनी जिवंत पकडले असल्याचेही वृत्त येऊन थडकले आहे. याबाबत तालिबानी सैन्याने ड्रोन हल्ल्याची पुष्टी देताना सांगितले की त्यांचे लढवय्ये आणि शस्त्रे पाकिस्तानच्या ‘गळ्यापर्यंत’ पोहोचू शकतात. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जैबीहुल्लाह मुजाहिद यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘आम्ही पाकिस्तानमधील महत्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आम्ही इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला केला. आमचा संदेश स्पष्ट आहे, आमचे हात त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचू शकतात!’’

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg