loader
Breaking News
Breaking News
Foto

सैनिक स्कूल जामगे प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

खेड - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे या प्रशालेमध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक मनोगतानी झाली. सदर प्रसंगी रुद्र मेजारी याने डॉ.सी. व्ही .रमन यांनी केलेल्या संशोधना वेळी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे कमांडंट यादव यांनी सी .व्ही.रमण यांच्या जीवनाविषयी माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे प्राचार्य डॉ. खोत व प्रशालेचे कमांडर यादव यांनी सदर स्पर्धेचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करण्यासाठी वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या, त्यानंतर प्रश्नमंजुषा ही स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत गाऊन केली. प्रश्नमंजुषेमध्ये प्रशालेतील छत्रपती शिवाजी हाऊस, तानाजी हाऊस, नेताजी हाऊस व संभाजी हाऊस यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी हाऊस ने विजय प्राप्त केला.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य डॉ.खोत एम. एस .कमांडंट यादव, विज्ञान विभाग प्रमुख कांचनकोटी एम एस, तसेच बंडगर डी.बी., हिरेमठ ए .एस, काळदाते एस.बी.यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाची सांगता बंडगर डी.बी यांनी आभार प्रदर्शन करून केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg