सावंतवाडी (प्रतिनिधी) - बहिणीच्या सातबारा उताऱ्यावरील आडनाव दुरुस्त करून देण्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या निरवडे (ता.सावंतवाडी) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) प्रविण दिलीप पोले यांच्यावर सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. दरम्यान याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी स्पष्ट केले. तक्रारदार (वय ४२ वर्षे) यांच्या बहिणीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीचे आडनाव लागले होते. यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी मे २०२५ मध्ये तहसीलदार सावंतवाडी यांच्याकडे अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी निरवडे तलाठी सजा कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. बहिणीला पाठपुरावा करणे शक्य नसल्याने तिने आपल्या भावाला (तक्रारदार) हे काम पाहण्यास सांगितले होते. तक्रारदार २९ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी प्रविण पोले यांना भेटले असता, पोले यांनी हे काम करण्यासाठी २,००० रुपयांची लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ३० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग एसीबी युनिटकडे तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून ३१ डिसेंबर २०२५ रोजी एसीबीने पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी प्रविण पोले यांनी तडजोडीअंती १,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाच मागणी प्रकरणी पोले यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणे ला.प्र.वि. परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस उप-अधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दिपक माळी व त्यांच्या पथकाने सुनील सावंत, प्रितम कदम, गोविंद तेली, विजय देसाई, महेश जगताप, भूषण नाईक, योगेश मुंढे, स्वाती राऊळ, उषा आईर व चालक नागेश खोत यशस्वी केली. आवाहन: कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांनी केले आहे. दरम्यान सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निरवडे तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाइम्स स्पेशल
खेड तालुक्यातील तळे गावात शिमगोत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.