loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रसायनीत स्वच्छता मोहीम

रसायनी (राकेश खराडे) - डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनी स्वच्छता मोहीम राबवून आज संपूर्ण रसायनी परिसर स्वच्छ करण्यात आला .डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्फत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहुल दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील रस्ता,रसायनी पोस्ट ऑफिस,मोहोपाडा तळाठी कार्यालय, जनता विद्यालय शाळेचा काॅर्नंर,पराडे काॅर्नंर,मोहोपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र,राजिप मराठी शाळा मोहोपाडा तसेच रसायनी पोलीस स्टेशन आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली.यावेळी शेकडो दासभक्त हातात विला,पंजा,झाडू,कोयता,गोणी,फावडे , प्लास्टिक शिट घेऊन हातात ग्लोज,मास्क लावून स्वच्छता साहित्य हातात घेऊन रसायनी परिसराची स्वच्छता करत असल्याचे दिसून आले.यावेळी श्री समर्थ दासभक्तांनी स्वच्छतेचा संदेश दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg