loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहिम

मालवण (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी येथील जन्मोत्सवापासून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आपला मावळा संघटनेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या गड, किल्ले स्वच्छता मोहीम अभियान मालवणमध्ये दाखल झाल्यानंतर आपल्या मावळा संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी राजे की जय... अशा आवेशपूर्ण घोषणा देत मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवर जात आज सकाळी स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. तत्पूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत तसेच माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी खासदार लंके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या मोहिमे अंतर्गत या मोहिमेचा एक भाग म्हणून किल्ले सिंधुदुर्ग तसेच बंदर जेटी येथे पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली असून किल्ले सिंधुदुर्गवर ठिकठिकाणी शिवरायांची स्मृतीं स्थळे तसेच किल्ल्यावरील मंदिरांचे नामफलक खासदार लंके यांच्या हस्ते लावण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छत्रपती शिवाजी महाराज यांची सागरी राजधानी असणार्‍या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी खासदार निलेश लंके यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे किल्ला परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून स्वच्छता मोहिमेदरम्यान खासदार लंके यांनी लोकवर्गणीतून उपलब्ध झालेल्या निधीतून किल्ला परिसरात आवश्यक असणारे बेंच, कचरा कुंड्या, सूचना फलक आदी साहित्य उपलब्ध करून दिले. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष रविकिरण गवस, जिल्हा सचिव रुपेश जाधव, उत्तम सराफदार, नजीरभाई शेख, नयन गावडे, समीर आचरेकर, अगोस्तीन डिसोजा (मधलो), माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, बबलू गावडे आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg