loader
Breaking News
Breaking News
Foto

युद्धस्थिती असलेल्या देशांत भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी

ठाणे (अमोल पवार) - जगात शनिवार पासून अमेरिका इजरायल विरुद्ध इराण युद्ध सुरू असून मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन भारत सरकारकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

टाईम्स स्पेशल

*आपत्कालीन संपर्क तपशील*- रामल्लाह (पॅलेस्टाईन)- फोन : +970592916418, ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in, दोहा (कतार)- फोन : 00974-55647502, ईमेल : cons.doha@mea.gov.in, रियाध (सौदी अरेबिया)- फोन : 00-966-11-4884697, WhatsApp : 00-966-542126748, टोल फ्री : 800 247 1234, ईमेल : cw.riyadh@mea.gov.in, तेल अवीव (इस्रायल)- फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378, ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in, तेहरान (इराण)- फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359, अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)- टोल फ्री : 800-46342, WhatsApp : +971543090571, ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in, कुवैत - फोन : +96565501946, ईमेल : community.kuwait@mea.gov.in, बाहरीन- फोन : 00973-39418071, मस्कत- टोल फ्री : 80071234, WhatsApp : +96898282270, ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in, जॉर्डन- फोन : 00962-770 422 276, बगदाद (इराक) - फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899 , वेबसाइट :eoibaghdad.gov.in, ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg