loader
Breaking News
Breaking News
Foto

दळखण येथील ग्रामदैवत श्री खेम देवतेच्या शिमगोत्सवास सुरुवात

दापोली (प्रतिनिधी) - दळखण येथील श्री खेम देव ग्राम दैवताच्या शिमगोत्सवास मोठ्या जल्लोषात, भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. श्री खेम देवाची पालखी गाव भेटीसाठी बाहेर पडली, त्यामुळे गावक-यांच्या उत्साहात आनंदाची मोठीच भर पडली आहे. गाव भेटीसाठी गावाबाहेर पडलेल्या दळखण येथील श्री खेम देवस्थानच्या पालखीत मुख्य श्री खेम देवतेबरोबरच खेतूरपाळ, चंद्रसुर्या, सातरोबा, महामाई, जाखमाता आणि काळंब या देवतांच्या मुर्ती बसविल्या जातात. पालखी तालुक्यातील पिचडोली, देहेण, राजापूर, सुकोंडी, मुर्डी, आंजर्ले, गिम्हवणे, खेर्डी, बांधतिवरे ही गावे घेतल्यानंतर दळखण गावाच्या सिमेवर येते तेव्हा तेथे सिमा पुजनाचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर मोठ्या उत्साहात, वाजत गाजत अबालवृद्धांच्या उपस्थितीत दळखण गावात पालखीचे आगमन होते. नवसाला पावणारी म्हणून देवता प्रसिद्ध आहे. देवतेची पालखी नाचविताना ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg