तेहरान: इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ऐतिहासिक आणि कठोर निर्णय घेत स्ट्रीट ऑफ होर्मुजू पूर्णपणे बंद केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युटीनरी गार्ड कॉप्सने या सामुद्रिक मार्गावर क्षेपणास्त्रे आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत, ज्यामुळे खाडी देशांमधून होणारी तेल आणि वायू निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. तज्ज्ञांच्या मते या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढू शकतात आणि त्या १५० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतात. हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एखाद्या ‘ऑइल बॉम्ब’पेक्षा कमी ठरणार नाही. इराणचा हा निर्णय थेट अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांसाठी मोठे आर्थिक आव्हान आहे. यामुळे तिसर्या महायुद्धाच्या शक्यताही वाढल्याचे मानले जात आहे.
स्ट्रीट ऑफ होर्मुज इतका अरुंद आहे की त्याच्या सर्वात कमी रुंदीच्या भागात जहाजांना जाण्यासाठी केवळ ३ किलोमीटरचा मार्ग उपलब्ध असतो. इराणने याच ‘कमकुवत’चा धोरणात्मक वापर केला आहे. या अरुंद समुद्री मार्गातून जगातील सुमारे २५ टक्के तेल आणि वायू वाहतूक होते. हा मार्ग बंद होण्याचा थेट अर्थ म्हणजे जागतिक स्तरावर भीषण ऊर्जा संकट. भारत, चीन आणि जपानसारखे आशियाई देश आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर या मार्गावर अवलंबून आहेत. पुरवठा थांबल्यास पेट्रोल-डिझेलची कमतरता निर्माण होऊ शकते.
तेलाचे दर वाढल्यास मालवाहतूक, वीज निर्मिती आणि इतर सर्व क्षेत्रांतील खर्च वाढतील. परिणामी जगभरात महागाई विक्रमी पातळीवर जाऊ शकते. अमेरिका नेहमीच होर्मुज खुला ठेवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची भूमिका घेत आली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन नौदल आणि इराण यांच्यात समुद्रात थेट संघर्ष होण्याची शक्यता अधिक तीव्र झाली आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.