loader
Breaking News
Breaking News
Foto

अजित पवारांचा मृत्यू फक्त १४ सेकंदात झाला! एबीआयचा अहवालात नेमकी कोणती माहिती?

मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला एबीआय चा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. मात्र, या अहवालात व्हिएसआर कंपनीला क्लीन चिट देण्यात आलीय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण विमानात तांत्रिक बिघाड नसल्याचा निष्कर्ष AAएबीआयने दिला आहे. क्लिअरन्स मिळाल्याच्या १४ सेकंदात विमान कोसळल्याचंही अहवालात म्हटल. म्हणजेच फक्त १४ सेकंदात अजित पवार यांचा मृत्यू झाला. पण, या १४ सेकंदात काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अजित पवारांच्या विमानाचे फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर उष्णतेमुळं खराब झाले. अजित पवार विमान दुर्घटनेचे खापर खराब हवामान आणि पायाभूत सुविधेवर फोडण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी डीजीसीAच्या अहवाला समोर आला होता. त्यात व्हिएसआर कंपनीच्या विमानात त्रुटी असल्याचा सांगण्यात आले होतं. मात्र एबीआयनं त्यांच्या अहवालात थेट व्हिएसआर कंपनीलाच क्लीन चिट दिल्याचे दिसत आहे. फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर उष्णतेमुळं खराब झाले आहेत. फ्लाईट डाटा रेकॉर्डरमधील डाटा दिल्लीतल्या लॅबमध्ये डाऊनलोड करण्यात आला. उड्डाणापूर्वी दोन्ही पायलटची ब्रेथ अनालायझर टेस्ट निगेटिव्ह आली होती. अजितदादांचं विमान कोसळताना पहिल्यांदा झाडांना धडकलं आणि त्यानंतर जमिनीवर आदळलं. विमानात २५०० लीटरच्या आसपास इंधन होतं. पुणे हवामान विभागानुसार २८ जानेवारीला विमानाच्या लँडिगवेळी दृश्यमानता २००० मीटर होती. बारामती विमानतळावर दृश्यमानता मोजण्याचं कोणतंही साधन नाही. बारामती विमानतळाचं एटीसीही फ्लाईंग स्कूल मॅनेज करतं पायलटनं बारामती विमानतळाला दृश्यमानता किती आहे असं विचारलं होतं. त्यावर ३ हजार मीटर दृश्यमानता आहे असं सांगण्यात आलं होतं.

टाइम्स स्पेशल

विमान लँड करण्यासाठी नियमानुसार ५ हजार मीटर दृश्यमानता हवी असते. ८ वाजून ४३ मिनिटं आणि ५९ सेकंदाला बारामती Aढउनं विमान उतरवण्यासाठी क्लिअरन्स दिला होता. त्याच्या १४ सेकंदानंतर म्हणजेच ८ वाजून ४४ मिनिटं आणि १३ सेकंदानं पायलटचा ओ शिट, ओ शिट असा आवाज ऐकू आला. विमानाच्या दोन्ही वैमानिकांना यापूर्वी बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव होता. अपघातावेळी विमान रनवेपासून ५० मीटर डाव्या बाजूला बाहेर कोसळलं. विमानाचा फ्लाईट डाटा रेकॉर्डर खराब झाल्याचं अहवालात म्हटलंय. याआधीही AAखइनं फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचं सांगितलं होतं. दृश्यमानताही कमी असल्याचं रिपोर्टमधून समोर आले आहे. क्लिअरन्स मिळाल्याच्या १४ सेकंदात विमान कोसळल्याचंही अहवालात म्हटलंय. त्या १४ सेकंदात नेमकं काय झालं हे फ्लाईड डाटा रेकॉर्डर आणि ब्लॅकबॉक्समधूनच समोर येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg