नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त एअर स्ट्राइक करत त्याच्या ३० हून अधिक शहरांना लक्ष्य केले. त्यानंतर, इराणने ऑपरेशन राबवत पश्चिम आशियातील ८ पेक्षा अधिक देशांवर क्षेपणास्त्र हल्ले करत पलटवार केला आहे. या हल्ल्यावेळी दुबई आणि अबू धाबीवर देखील हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे इतक्या वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेली गोष्ट या हल्ल्यामध्ये घडल्याचे समोर आले आहे. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफाजवळही इराणने अणवस्त्राचा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि रहिवाशांना बाहेर काढून ही इमारत आता रिकामी करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दुबईतील पाम जुमेराह परिसरातील फेअरमोंट द पाम या सुप्रसिद्ध हॉटेलवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. यासंदर्भातील काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आकाशात धुराचे प्रचंड लोट उसळताना दिसत असून प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मोठा स्फोट झाल्यानंतर ’द पाम’ परिसरातून धूर उसळताना दिसला. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा दाखल झाल्या आहेत.
अणू करारावरून गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या संघर्षाचे रुपांतर शनिवारी युद्धात झाले. इराणने अणू करार करू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्या अमेरिकेने शनिवारी इस्रायलच्या मदतीने इराणवर एक दोन नव्हे तर तब्बल ७० क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. राजधानी तेहरानसह विविध महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये ५३ शाळकरी मुला-मुलींसह काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अमेरिका-इस्रायलकडून हल्ले होताच देशात तात्काळ आणीबाणी लागू झाल्याचे जाहीर करत इराणने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) दुबई, अबुधाबी, कुवेत, कतार आणि बहरीनमधील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करताना हवाई हल्ले केले. त्यामुळे आता हा संघर्ष केवळ अमेरिका-इस्रायल आणि इराणपुरता मर्यादित राहिला नसून त्याची झळ आखाती देशांनाही बसल्याने मध्य-पूर्व आशियातील या युद्धाच्या भडक्याने जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अणू करारावरून अमेरिका आणि इराणमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू होता. इराणने कोणत्याही परिस्थितीत अणवस्त्रांची निर्मिती करू नये तसेच, अन्य कोणत्याही देशांसोबत अणू करारदेखील करू नये यासाठी अमेरिका सातत्याने प्रयत्नशील होती. इराणने अणू करार करण्याचे प्रयत्न केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. परंतु, इराणचे राष्ट्रप्रमुख आया तुल्लाह खोमेनी यांनीही आम्ही कोणत्याही अन्य देशांच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे प्रत्युत्तर दिले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रांमध्ये कमालीचा तणाव वाढला होता. दोन्ही राष्ट्रांकडून एकमेकांविरोधात युद्ध करण्यासाठी सैन्याची जमवाजमव करण्यात येत होती. दोघांकडूनही हल्ले करण्याचे इशारे देणे सुरूच होते. अखेरीस शनिवारी अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने शनिवारी सकाळी इराणवर एकामागोमाग एक तब्बल ७० क्षेपणास्त्र डागले. इराणची राजधानी तेहरानसह देशातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीव शहरांमध्ये हल्ले केले. यासोबतच दुबई, अबुधाबी, कुवेत, कतार, बहरीन आदी आखाती देशांतील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ले करत ते उद्धवस्त करण्यास सुरुवात केली. इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशांनी हवाई सेवा बंद केली. एकंदरीतच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले करणे सुरू होते. या हल्ल्यांमुळे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमधील व्यापारासह शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. शिवाय लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.











































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.