loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील १३ जण दुबईत अडकले, सर्व जण सुखरूप!

संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे सध्या पत्नी ज्योती यांच्या सोबत दुबई येथे गेले असताना तेथे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संगमेश्वर तालुक्यात चिंतेचे वातावरण होते. देवरुख मधील काही जण तसेच साखरपा येथील शिवसेना नेते बापू शेट्ये हे ही पत्नीसह सध्या दुबईत आहेत. ज्योती सह १० जण दकाल रात्री पासूनच दुबई परिसरात इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे तणाव निर्माण झाला आणि परिस्थिती बदलली.. अचानक हवाई सेवा बंद झाल्याने अनेकांचे हाल झाले. त्यात देवरुखचे सुरेश सप्रेही दुबईत असल्याची बातमी पसरली. मोठा जनसंपर्क असणार्‍या सुरेश सप्रे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु झाला. मात्र दिवसभर संपर्क झाला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काल रात्री एका व्हॉटस्‌ऍप संदेशाद्वारे त्यांनी सुरक्षित असल्याचे कळवले तर आज सकाळी ज्योती यांनीही मेसेज करून आम्ही एका हॉटेलमध्ये आहोत, पुढील सूचना मिळेपर्यंत हॉटेल मध्येच मुक्काम करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेऊ असेही ज्योती यांनी सांगितले. दरम्यान सप्रे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील शिवसेना नेते बापू शेट्ये व पत्नी सोनम व अन्य चार जण दुबईत अडकलेत. काल विमान सर्व उड्डाणे रद्द झालेने ते सर्व विमानात बसले होते पण ते उड्डाण होत नसलेने जावू शकले नाहीत. तसेच देवरुखमधील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे व ज्योती सप्रे यांचे समवेत भाजपा नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, जितेंद्र निमकर परिवार असे सात जण असे जिल्ह्यातील १३ जण आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg