मालवण (प्रतिनिधी) - मालवण वायरी येथे शौचालयाच्या टाकीत पडलेल्या गाईला बजरंग दल आणि नगरपालिकेतील कर्मचाऱ्याच्या सहकार्याने व तसेच प्राणीमित्र आनंद बांबर्डेकर यांच्या मदतीने सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. मालवण वायरी येथे शौचालयाच्या कामानिमित्त उघड्या असलेल्या टाकीत गाय पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांना समजताच त्यांनी याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती देत मदतीसाठी पाचारण केले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांनाही मदतीसाठी आवाहन करण्यात आल्यावर त्यांनीही तेथे धाव घेतली. टाकीत पडलेल्या गायीला बजरंग दल कार्यकर्ते व स्वच्छता कामगार यांच्या सहकार्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या बचावकार्यात बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, आनंद बांबर्डेकर, अमित भगत तसेच नगरपालिकेचे स्वच्छता मुकादम आनंद वळंजू, स्वच्छता कर्मचारी बाबू कोळंबकर, नवनाथ परब, रितेश परब, समीर कसले, विजय काळसेकर, सदा मालवणकर, यश घाडी, मंदार तांडेल, लोकेश वायंगणकर आदी सहभागी झाले होते. या बचाव कार्यासाठी श्रीराज बादेकर यांनी शिल्पा यतीन खोत, आनंद बांबर्डेकर व स्वच्छता मुकादम वळंजू व कर्मचारी यांचे आभार मानले.
दरम्यान, मालवण शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्याची चिंता पुन्हा एकदा समोर आली आहे. याबाबत नगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.