ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिस आयुक्तालयात मुंब्रा परिसरात किरकोळ वादातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूसदृश हत्याराने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जखमी मुलाच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पसार दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौसा मुंब्रा येथील अलजबीर कॉलनी परिसरात राहणाऱ्या मेहेक शेख (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांचा भाऊ मोसीन (वय १४) हा २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास नुरी मशिदीत तरावीह नमाज अदा करून मित्र इबाद याच्यासोबत घरी जात होता.
दरम्यान, इबाद आणि अमान यांच्यात दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अमान याने मोसीनवर चाकूसारख्या धारदार हत्याराने पाठीच्या डाव्या बाजूस वार करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच इबादसोबत असलेल्या अन्य एका मित्रानेही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे त्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी मोसीन घरी आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
तसेच जखमी मोसीन याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून उपचारानंतर मोसीन याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर याप्रकरणी मारहाण करणाऱ्या त्या दोघांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली असून पसार झालेल्या दोघांचा शोध वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.