ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिस आयुक्तालयात मुस्लिम धर्मियांच्या रमजान या पवित्र महिन्यात मुंब्रा परिसरात वाहतूक नियमन करत असताना, बुलेट या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालत मारहाण केली. याचदरम्यान तक्रारदार पोलिस कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात फिरकवल्याने कानातून रक्तस्राव झाला. याप्रकरणी विरुद्ध दिशेने दुचाकी घेऊन पसार झालेल्या त्या आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
२७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत मुंब्रा पोलिस ठाण्याच्या एनडीपीएस पथकाला विशेष कर्तव्य देण्यात आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत होते. रमजान महिन्यामुळे परिसरात नमाज पठणासाठी मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी नियंत्रणाचे आदेश देण्यात आले होते. सायंकाळी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास वाय जंक्शनजवळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिस कर्मचारी वाहतूक सुरळीत करत होते. त्यावेळी बुलेट दुचाकीवरील चालक व मागे बसलेला इसम मोठ्याने हॉर्न वाजवत, आरडाओरडा करत वाहतुकीत अडथळा निर्माण करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना वाहतूक नियमन सुरू असल्याचे सांगितले असता दुचाकी चालकाने पोलिसांना शिवीगाळ करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर मागील सीटवर बसलेला खाली उतरून पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालत त्यांच्या डाव्या कानावर जोरात ठोसा मारल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या मारहाणीत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला चक्कर येऊन काही काळ ऐकू येणे बंद झाले. त्या घटनेनंतर ते दोघे दुचाकीसह उलट्या दिशेने भरधाव वेगाने मुंब्रा बाजूकडे पळून गेले.
जखमी पोलिस कर्मचाऱ्याला सहकारी पोलिसांनी तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत कानाला अंतर्गत दुखापत झाल्याची शक्यता व्यक्त करत कानात पाणी जाऊ न देण्याचा सल्ला दिला असून पुढील तपासणीसाठी ईएनटी तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. या प्रकरणी पोलिसांकडून सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाला असून फरार आरोपींचा शोध वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.