loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भेट देत घेतला आढावा

बारामती - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे भेट देत सविस्तर आढावा बैठक घेतली. यावेळी कारखान्याच्या कार्यप्रणाली, ऊस गाळप हंगामाची तयारी, आर्थिक स्थिती व भविष्यातील विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीदरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाल्या की, राज्याचे लोकप्रिय दिवंगत नेते अजितदादा पवार यांचे स्वप्न होते की माळेगाव सहकारी साखर कारखाना देशात क्रमांक एक बनावा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने, प्रामाणिकपणे व नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. “आपण सर्व मिळून अजितदादांचे स्वप्न नक्की पूर्ण करू, असा मला ठाम विश्वास आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. आढावा बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत भावपूर्ण आदरांजली वाहिली. याप्रसंगी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg