loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडीवली परिसरात नर बिबट्याचा मृत्यू; वनविभागाकडून शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील कोंडीवली दगडीचा पाणी परिसरात एका नर बिबट्याचा मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शिंदे नावाच्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, मृत आढळलेला बिबट्या अंदाजे सात ते आठ वर्षांचा असून तो भक्ष्याच्या शोधात कोंडीवली परिसरात आला होता. मात्र, सलग काही दिवस भक्ष्य न मिळाल्याने तो भुकेने व्याकुळ झाला आणि याच कारणामुळे सुमारे दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृत बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. शवविच्छेदनानंतर वनविभागाच्या नियमांनुसार बिबट्याच्या मृतदेहावर अग्नी देऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वनक्षेत्रपाल पाटील, वनपाल उदय भागवत, खेडचे वनरक्षक अशोक ढाकणे, तसेच रानबा, डोईफोडे, पशुवैद्यकीय अधिकारी निंभोरे आणि त्यांचे सहाय्यक पाटील आदी उपस्थित होते. या घटनेनंतर परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg