loader
Breaking News
Breaking News
Foto

११ मार्च रोजी भरणे, खेड येथे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळा

खेड - अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी (रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम) व प.पू.कानिफनाथ महाराज (उत्तराधिकारी, नाणीजधाम) यांच्या कृपाशीर्वादाने खेड भरणे नाका (मेहता पेट्रोल पंपाजवळ), ता. खेड, जि. रत्नागिरी येथे दिनांक ११ मार्च २०२६ रोजी (बुधवार) जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने सामाजिक उपक्रमांतर्गत शिलाई मशीन वाटप, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, श्रींच्या पादुकांचे दर्शन, महाप्रसाद, पुष्पवृष्टी व सांगता असा भव्य दिव्य कार्यक्रम रामानंद संप्रदाय खेड रत्नागिरी सेवा समितीमार्फत आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यातून वैदिक सनातन धर्म, भारतीय संस्कृती व आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यात येणार असून भाविकांना भक्ती, ज्ञान व मोक्षमार्गाचा संदेश दिला जाणार आहे. “तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा” हा मानवतेचा व सदभावनेचा संदेशही या माध्यमातून दिला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तगणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg