loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाडमध्ये भोसले स्कूलची सुवर्ण कामगिरी

हिंदी विकास संस्थानतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड’ परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांवर आपली छाप उमटवली. शाळेची विद्यार्थिनी लिसा मेंडीस हिने उल्लेखनीय कामगिरी बजावत 'राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ प्राप्त केला. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परीक्षेला शाळेचे पहिली ते दहावीतील एकूण १०९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, १२ विद्यार्थ्यांना रौप्यपदक तर १० विद्यार्थ्यांना कांस्यपदक मिळाले. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg