loader
Breaking News
Breaking News
Foto

एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींवर मुरुड पोलिसांकडून कार्यवाही

कोर्लई (राजीव नेवासेकर) - मुरुड पोलिसांकडून रात्री समुद्रात गस्ती करीत असताना नानवेल दीप गृहापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर श्रीवर्धन येथील दोन बोटी संशयित्रीत रित्या मासेमारी करताना आढळून आल्या या बोटीमधील सर्वांची कसून तपासणी केली असता सदरची बोट एलइडीद्वारे मासेमारी करताना आढळून आल्याने तसे साहित्य बोटीत आढळून आल्याने दोन्ही बोटी व साहित्य मुरुड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी ही धडक कार्यवाही केल्याने अवैध मासेमारिस आळा बसणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीवर्धन येथील धनलक्ष्मी बोट क्रमांक एम एच 03 -एम एम4094 या बोटीमधील एल इ डी लाईट 10 नग, पाण्याखाली वापरण्यात येणारे एलइडी बल्ब 2 नग एक जनरेटर जप्त करण्यात आला आहे. वैष्णवी बोट क्रमांक एम एम 4197 बोटीमधील एलइडी लाईट 8 नग, पाण्याखाली सोडण्यात येणारे बल्ब 2 नग, एक जनरेटर ताब्यात घेण्यात आले आहेत. या दोन बोटीमधील श्रीवर्धन भरडखोल येथील मन्सूर हमीद सोलकर, वैष्णव वाघे, प्रमोद चौलकर, चंद्रकांत पाटील आदींवर रीतसर कार्यवाही मासेमारी अधिन्यमध्वारे करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg