loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकमान्य वाचनालय लांजामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन आणि वैज्ञानिकांचे ग्रंथ प्रदर्शन उत्साहात

केळंबे-लाजा (सिराज नेवरेकर) - लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिकांचे चरित्र आणि विज्ञानविषयक विविध पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन लांजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंत, लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे यांचे हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी लोकमान्य वाचनालय कार्यवाह उमेश केसरकर रघुनाथ खुर्दे, रविंद्र दळवी, प्रमिला पोटफोडे सभासद आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकमान्य वाचनालयाचे कार्यवाह उमेश केसरकर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाची महती विशद करताना सी. व्ही .रामन यांची चरित्रात्मक माहिती दिली. लांजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंत यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन तसेच वाचनाचे महत्त्व तसेच वाचनाने आलेले स्वानुभव कथन केले. वाचनालयामुळे समाजाची उन्नती होते. सृजनशीलतेसाठी वाचन आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

टाइम्स स्पेशल

वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे यांनी डॉ. सी.व्ही. रामन यांनी वैज्ञानिक घडामोडींचा परामर्श घेत विज्ञान संशोधनाती भारतीय प्रगतीची स्तुती केली. तसेच भविष्यात विज्ञान क्षेत्रात नोबेल पुरस्कार भारतीयांना मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन मार्गचोखाळणे गरजेचे असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.ग्रंथपाल रामचंद्र लांजेकर यांनी केले तर आभार कार्यवाह उमेश केसरकर यांनी मानले. या कार्यक्रमास वाचनालयाचे वाचक, सभासद, बालवाचक, बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg