संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मध्यपूर्वेत तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या चर्चांमुळे संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फुणगुस, कसबा, डिंगणी, कोंडीवरे आदी गावांतील अनेक युवक रोजगारानिमित्त दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. तर इराण आणि इस्रायल येथे तालुक्यातील नागरिकांची संख्या अत्यल्प असल्याचे समजते. याबाबत दुबईमध्ये कार्यरत असलेले अजमल खान यांनी संगमेश्वर न्यूज ला दिलेल्या माहितीनुसार, सध्या तेथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून भारतीय नागरिक सुरक्षित आहेत.
“खरं सांगायचं तर आम्ही सर्व आपल्या आशीर्वादाने सुखरूप आणि आनंदात आहोत. दुबईमध्ये भारतातील साधारण १७ ते १८ टक्के लोक राहतात, म्हणजे जवळपास एक कोटी भारतीय येथे आहेत. तरीही येथे कोणताही मोठा प्रॉब्लेम नाही. सर्वजण सुरक्षित आहेत आणि आपापले काम व्यवस्थित करत आहेत". "काही ठिकाणी थोड्याफार अडचणी निर्माण झाल्या होत्या, पण त्या लवकरच नियंत्रणात आल्या. त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीही नाही. दुबई सरकारने सर्वांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना केली आहे, त्यामुळे सर्व नागरिक सुरक्षित आहेत.सर्व काही सुरळीत आणि व्यवस्थित सुरू आहे. आपल्या आशीर्वादामुळे काहीही वाईट होणार नाही, आपण निश्चिंत राहा.”
अजमल खान यांच्या या निवेदनामुळे संगमेश्वर तालुक्यातील कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून दुबईतील परिस्थिती स्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.