सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी शहरात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढत असून, आता बिबट्याने थेट निवासी भागात शिरकाव केला आहे. सर्वोदय नगर परिसरात मध्यरात्री बिबट्याने एका पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली असून, हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे. सावंतवाडी शहरालगत असलेल्या नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी वन्यप्राण्यांचा वावर नेहमीचाच आहे. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबट्याने सर्वोदय नगरमधील एका घराच्या परिसरात संरक्षक भिंत ओलांडून प्रवेश केला. काही वेळ दबा धरून बसल्यानंतर, बिबट्याने तेथील पाळीव कुत्र्यावर झडप घातली. कुत्र्याला ठार करून बिबट्या त्याला आपल्या जबड्यात पकडून पुन्हा जंगलाच्या दिशेने पसार झाला.
सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, बिबट्याचा हा शिकारीचा थरार समोर आला असून तो कुत्र्याचा पाठलाग करताना स्पष्ट दिसत आहे. सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. काही दिवसांपूर्वी सालईवाडा परिसरात गव्यांचा कळप दिसून आला होता, आणि आता थेट बिबट्या दिसून आल्याने रहिवासी धास्तावले आहेत. अन्न आणि पाण्याच्या शोधात हे प्राणी नागरी वस्तीकडे वळत असल्याचे बोलले जात आहे. शहराच्या मध्यवस्तीत बिबट्या इतक्या सहजपणे शिरत असल्याने रहिवाशांनी वनविभाग आणि नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर वनविभागाने या परिसरात तात्काळ गस्त वाढवावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.