रत्नागिरी : मच्छीमार सहकारी संस्थांच्या सदस्यांनी यांत्रिक नौकांसाठी वापरलेल्या डिझेल तेलावरील विक्रीकराची प्रतिपूर्ती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या डिझेल प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यासाठी आतापर्यंत एकूण 20 कोटी 18 लाख 39 हजार 975 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ही योजना कार्यान्वित असून शासनाकडून मिळणारा निधी व्हीपीडीए प्रणालीद्वारे थेट पात्र मच्छीमारांच्या खात्यात जमा केला जातो. यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील 26 मच्छीमार सहकारी संस्थांच्या 1166 यांत्रिक नौकांसाठी 31 हजार 895.39 किलो लिटर डिझेल कोटा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 6 कोटी 30 लाख 44 हजार 281 रुपये इतका निधी 675 नौकामालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये शासनाच्या आदेशानुसार 13 कोटी 87 लाख 95 हजार 694 रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या दोन्ही टप्प्यांतील निधीची एकत्रित रक्कम सुमारे 20.18 कोटी रुपये इतकी आहे. कोषागाराची प्रक्रिया पूर्ण होताच उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, मागील नऊ वर्षांतील प्राप्त निधीकडे पाहिले असता या योजनेअंतर्गत जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळाल्याचे स्पष्ट होते. सन 2016-17 मध्ये 1935.20 लाख, 2017-18 मध्ये 1493 लाख, 2019-20 मध्ये 900 लाख व 1635 लाख, 2020-21 मध्ये 1353.40 लाख, 2021-22 मध्ये 2203 लाख, 2022-23 मध्ये 3085 लाख, 2023-24 मध्ये 6099 लाख आणि 2024-25 मध्ये 2534.29 लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या सर्व वर्षांचा एकत्रित विचार केला असता सुमारे 21 हजार 237.89 लाख रुपये म्हणजेच अंदाजे 212.38 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.
सध्या जिल्ह्यातील 25 मच्छीमार सहकारी संस्थांचे प्रस्ताव प्रलंबित असून त्यासाठी सुमारे 6.36 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होताच प्राधान्यक्रमानुसार उर्वरित पात्र मच्छीमारांना प्रतिपूर्तीची रक्कम अदा करण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही योजना मच्छीमारांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याची भावना मच्छीमार बांधवांकडून व्यक्त होत आहे.





















































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.