loader
Breaking News
Breaking News
Foto

कब - बुलबुल अंतर्गत कब चतुर्थ चरण व बुलबुल हिरकपंख राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये श्री समर्थ कृपा विद्यालयाचे यश

जिल्हा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी भारत स्काऊटस आणि गाईडस् जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित कब- बुलबुल जिल्हा मेळावा (सन- २०२५ - २६) घेण्यात आला. या मेळाव्यात रत्नागिरी जिल्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. कब - बुलबुल अंतर्गत कब चतुर्थ चरण व बुलबुल हिरकपंख राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी. बी .एस. ई) वेरळ येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रिन्स मोरे, स्वरा परशेट्ये या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केले. तसेच हस्त कौशल्य स्पर्धेमध्ये प्रशालेच्या कब व बुलबुल गटाने प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना फ्लॉक लिडर राधा चव्हाण व कब मास्तर दादासाहेब ब्राम्हणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, संस्थेचे चेअरमन उदय शेटवे, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg