loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई गोवा महामार्गावर मालवाहू ट्रकला भीषण अपघात,ट्रक चालकाचा चिरडून मृत्यु

लांजा- ऐन होळी सणाच्या दिवशीच मुंबई गोवा महामार्गावर मालवाहू ट्रकला भीषण अपघात झाला असून या अपघातात ट्रक चालकाचा केबिन खाली चिरडून जागीच मृत्यू झाला अपघातग्रस्त ट्रक पनवेलहून माल घेऊन गोव्याला निघाला होता. मुंबई गोवा हायवेवर लांजा नजीक धनावडेशेती फार्म जवळ कंटेनरला साईड घेताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक घासत जाऊन रस्त्यात मधोमध कलंडला. ट्रक चालकाने ट्रकला रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर आपटले. हा अपघात आज दुपारी सव्वा एकच्या सुमारास झाला ङ्गङ्गअपघातात ट्रक चालक केबिनमध्ये अडकून पडला होता.सुरुवातीला काही क्षण तो जिवंत होता. स्थानिक रहिवाशांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रकची केबिन हलवून त्याला बाहेर खेचून काढले.पण तोपर्यंत ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg