loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रद्धेचा अनोखा जागर! खेर्डी चंडिका देवी मंदिरात आजही जपली जातेय ’शेरणे’ काढण्याची पुरातन परंपरा

खेर्डी (सागर गोवळे) - कोकणची भूमी ही देवदेवतांच्या वास्तव्याने आणि अनोख्या लोकपरंपरांनी समृद्ध आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दापोली तालुक्यातील खेर्डी येथील श्री चंडिका देवीच्या मंदिरात आजही शेकडो वर्षांची ‘शेरणे काढण्याची’ परंपरा मोठ्या श्रद्धेने पाळली जाते. आधुनिक काळातही ही परंपरा या देवस्थानचे अविभाज्य अंग बनली आहे. खेर्डी येथील चंडिका देवीच्या जुन्या मंदिरात भाविक आपल्या समस्या, संकटं किंवा मनातल्या इच्छा घेऊन देवीच्या चरणी साकडं घालतात. जेव्हा एखादा भाविक देवीला नवस बोलतो किंवा संकट निवारणासाठी प्रार्थना करतो, तेव्हा ’शेरणे’ काढले जाते. यामध्ये मंदिराचे मानकरी किंवा पुजारी देवीसमोर बसून विशिष्ट पद्धतीने कौल लावतात किंवा देवीची आज्ञा घेतात. जमिनीमध्ये पुरलेले नारळ पालखी शोधून काढते, हे ग्रामदैवतेचे मोठ्ठे वैशिष्ट्‌य आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg