loader
Breaking News
Breaking News
Foto

पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला ईश्वराचे रूप देणारे मळण धामणस्करवाडी येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील मळण धामणस्कर वाडी येथील नामवंत मूर्तिकार चंद्रकांत वसंत धामणस्कर यांनी पाषाणातून अनेक देवदेवतांच्या तसेच महापुरुषांच्या मुर्त्या घडवत आहेत. तसेच लाकडामधून अनेक मुर्त्या तसेच देव देवतांच्या पालख्या त्यांनी घडविल्या आहेत. शृंगारतळी पालपेणे रस्त्यावर विश्वकर्मा आर्ट स्टुडिओ म्हणून त्यांचा वर्कशॉप आहे. या वर्कशॉप मध्ये मंदिरातील पाषाणमूर्ती, गौरीचे लाकडी मुखवटे, देव देवतांच्या पालख्या, हात पायाच्या लाकडी गौराई, लाकडी देव्हारे ते नेहमी बनवत असतात. दगडातून तसेच लाकडामधून विविध मूर्ती घडवणारा मूर्तिकार म्हणून सर्वत्र ते प्रसिद्ध आहेत. पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला ईश्वराचे रूप प्राप्त करणारे मळण धामणस्करवाडी येथील मूर्तिकार चंद्रकांत वसंत धामणस्कर आहेत. दगडातून विविध मूर्ती घडवणारा कलाकार म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध आहे. ईश्वराच्या मूर्ती पूजनाने सर्व प्रकारच्या सुखाची पूर्ती होते परंतु त्याच ईश्वराच्या मुर्तीला तयार करण्यासाठी किती घाम गाळावा लागतो, असेच घाव दगडावर घालत गेल्या १५ वर्षापासून रक्ताचे पाणी करून घाम गाळून अनेक भक्तांना ईश्वर पूजनाचा मार्ग दाखवणारे मळण धामणस्करवाडी येथील मूर्तिकार चंद्रकांत वसंत धामणस्कर हे अनेक देव देवता तसेच महापुरुषांच्या मूर्तीचे निर्माते आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घणाचे गाव सोसल्याशिवाय दगडाला आणि देवालाही देवपण येत नाही असे म्हणतात जो देव भक्तीने मिळवता येतो तर कोणी भक्ती आणि शक्तीने देवाला तयार करतो तिथूनच खऱ्या अर्थाने भक्तीचा दरवाजा उघडतो. भक्ती आणि शक्तीच्या सहयोगातून कुणाला भौतिक सुख तर कोणाला ऐहिक सुख मिळते ईश्वराच्या मूर्ती पूजनाने सर्व प्रकारच्या सुखाची पूर्ती होते. परंतु त्याच ईश्वराच्या मुर्तीला तयार करण्यासाठी मूर्तीकाराला कष्ट घ्यावे लागतात. मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांनी सांगितले की, माझे वडील वसंत बाळाजी धामणस्कर हे नामवंत मूर्तिकार होते. त्यांच्याकडूनच मूर्ती बनवण्याची कला मी अवगत केली. मुंबईमध्ये सुद्धा असताना मी दगड मूर्ती बनवत असे. देव देवता महापुरुष यांच्या मुर्त्या कोदबी पाषाणापासून मी बनवत आहे. देवतेची मूर्ती बनवण्यापूर्वी आपल्या मनात व डोळ्यात अवतरली पाहिजे. तरच ती उत्कृष्टपणे घडवता येते. ज्या ईश्वराने मानवाला जन्म दिला, आकार दिला त्याच ईश्वराला चंद्रकांत धामणस्कर हे घणाचे घाव घालून घडवत आहेत, आकार देत आहेत. त्यांनी आजपर्यंत दगडामधून अनेक देव देवतेच्या मूर्ती घडवल्या आहेत. पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला ईश्वराचे रूप देण्याचे काम चंद्रकांत धामणस्कर करत आहेत.

टाईम्स स्पेशल

दगडाची मूर्ती घडवून ते कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. त्यांच्या प्रत्येक घणाच्या घावात ईश्वराची शक्ती आणि भक्ती आहे दगडावर पडलेल्या प्रत्येक घाव हनुमान चालीसा आहे, तोच घाव गायत्री मंत्र आहे आणि तोच घाव ओमकार सुद्धा आहे. चारधामची यात्रा करून ईश्वर प्राप्ती होते, असे म्हणतात ही यात्रा करणेही काहींना शक्य होते, काहींना शक्य होत नाही अशा भाविकांसाठी ईश्वराने कदाचित चंद्रकांत धामणस्कर यांच्या रूपाने दगडात चारधाम तयार करण्याचे कार्य सोपवले असावे, खेड चिपळूण या भागातून कोदंबी प्रकारातील मोठे पाषाण आणून चिनी आणि घणाच्या सहाय्याने तो आर्डर प्रमाणे देव घडवतात आणि आपला चरितार्थ चालवितात यासाठी त्यांना त्यांचा मुलगा विश्वनाथ धामणस्कर हे मदत करत असतात. त्यानेही या मूर्ती कलेचे शिक्षण घेतले आहे. मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांनी घडवलेल्या देव देवता व महापुरुषांच्या मुर्त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याची विक्री होत आहे. साधारणतः ५० हजार रुपये पासून ते अगदी ३० ते २० हजार रुपये पर्यंत मूर्ती ते विकतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg