loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईमध्ये एक लाख घरे देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : लवकरच मुंबईत तसेच लगतच्या क्षेत्रात गिरणी कामगारांना एक लाख घरे बांधून देण्याचा सरकारने निर्णय घेतल्याची माहिती काल विधान परिषदेत उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सचिन अहिर यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी विधानसभा सभागृहात कामगारनेते आणि संबंधित खात्याचेमंत्री आणि सचिवांबरोबर या संदर्भात बैठक घेतली होती, त्याची माहिती देऊन सांगितले की, या प्रश्नावर गृहनिर्माण सचिव आसीम गुप्ता आणि म्हाडाच्या अन्य अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेने कामगार वर्गात दिलासा निर्माण झाला आहे. १६ कामगार संघटना एकत्र येऊन संयुक्त लढा समितीच्या वतीने 10 मार्च रोजी गिरणी कामगारांचे आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वा खाली अभूतपूर्व आंदोलन छेडण्यात आले होते, त्याला अखेर यश आले आहे, असे लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी पुन्हा एकवार म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना सांगितले आहे की, मुंबईत जेथे जेथे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत, तेथे एक एफएसआय देऊन गिरणी कामगारांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. म्हणजे 2000 घरे होतात येथे ५०० अधिकची घरे बांधण्यात यावी आणि जेथे ३००० घरे होतात तेथे ७५० अधिकची घरे बांधून देण्यात यावी. मग बंद गिरण्यांची जागा असेल, क्लस्टर, एसआरए असेल अशा अनेक गृहनिर्माण प्रकल्पात गिरणी कामगारांना घरे निर्माण करून देण्यात यावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असेही सांगितले, दूरच्या ठिकाणी ज्यांना घरे हवी आहेत ते कामगार ही घरे घेऊ शकतात,मात्र कामगारांचा घराचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. तेथे घरे घेण्याची सक्ती काढून टाकण्यात आली आहे. त्यासाठीची जाचक अट दूर करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

ज्या गिरणी कामगारांच्या जीवावर मुंबई उभी आहे त्यांना पुनर्वसन प्रकल्पात घरे मिळालीच पाहिजेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले आहेत, अशा गिरणी कामगारांच्या मागे उभे रहा, या गोष्टीचीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आठवण करून दिली आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात मा.उपमुख्यामंत्री महोदयांचे हे उत्तर महत्त्वपूर्ण मानले जात आहे. लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते तसेच लढा समितीच्या सर्वच कामगार नेत्यांनी याचे स्वागत केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg