loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रसिद्ध श्रीराम मंदिरात आज हनुमान जन्मोत्सव सोहळा

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरीतील सुप्रसिद्ध व प्राचीन श्रीराम मंदिरात गुरुवार दि. २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुुरुवारी सकाळी ६.०० वा. षोडशोपचार पूजा, अभिषेक, आरती होईल. त्यानंतर सकाळी ६.३९ वा. हनुमान जन्मोत्सव साजरा होईल व सर्व भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद देण्यात येईल. यानंतर देवळात दिवसभर विविध भजन मंडळे आपली सेवा श्री हनुमान चरणी रुजू करतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी ११ वा. श्री माऊली महिला भजन मंडळ रविंद्रनगर कुवारबाव रत्नागिरी (गायिका अंकिता तोडकरी, मधुरा काणे, सुवर्णा जंगम, शोभा पाटील, तबला सागरी चाळके) यांचे भजन सादर होईल. तर दुपारी १.०० वा. श्री एकमुखी दत्त महिला भजन मंडळ घुडेवठार रत्नागिरी (गायिका सौ. प्रेरणा विलणकर, पखवाज रमाकांत पांचाळ) आणि दुपारी ३.०० वा. स्वानंदी महिला भजन मंडळ नाचणे रत्नागिरी (गायिका सौ. मीना ठाकूर, सौ. शुभांगी नातू, तबलासाथ कृणाल ठाकूरदेसाई) आपली भजन सेवा सादर करतील. सायंकाळी ६.०० वा. श्रीराम भजन मंडळ श्रीरामआळी रत्नागिरी (बुवा सतीश पांचाळ, सचिन टिकेकर, राम साटेलकर, रमाकांत पांचाळ, प्रदीप सागवेकर, शेलार, शिवराम कदम, रविंद्र सावंत, आप्पा घोसाळकर, लिंगायत, सनगरे आदी मंडळी आपली सेवा सादर करतील. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्था रत्नागिरी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg