उरण (विठ्ठल ममताबादे) - उरण शहरात तसेच उरण तालुक्यातील विविध ग्रामीण भागात श्री हनुमान जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. पागोटे,हनुमान कोळीवाडा, वेश्वि,वशेणी, करंजा आदी गावात तसेच उरण शहरात भाजी मार्केट बाजारपेठ तसेच गणपती चौकात श्री हनुमान जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.
उरण शहरातील गणपती चौकात श्री हनुमान जन्मोत्सव सामाजिक मंडळ उरण यांच्या वतीने पहाटे ४ वाजता महापूजा, पहाटे ५ वाजता हभप सुधीर विश्वनाथ बाळ यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले.भाविक भक्तांना कल्पेश ठक्कर यांच्या माध्यमातून उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले. सकाळी ८ ते १२ या वेळेत श्री गजानन प्रसादिक भजन मंडळ यांचे भजन झाले. दुपारी १२ ते ३ या वेळेत कै. सुनिता महादेव ढोले, कै. मीना के रूपचंदानी यांच्या स्मरणार्थ महाप्रसाद देण्यात आले.त्यानंतर शारदा संगीत भजन मंडळ विचुंबे यांचे भजन झाले. शेवटी पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला श्री गजानन प्रासादिक भजन मंडळाची साथ संगत लाभली.मंदिरात श्री हनुमान मूर्तीचे दर्शन घेतलेल्या विविध प्रतिष्ठित मान्यवरांचे यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.दिवसभर चाललेल्या विविध कार्यक्रमांना भाविक भक्तांचा उत्तम प्रतिसाद लाभला.भाविक भक्तांची दिवसभर गर्दी पहावयास मिळाली. सर्वच भावीक भक्तांनी शांततेत रांगेत उभे राहून शिस्तीने दर्शन घेतले.सर्वच कार्यक्रम उत्तमपणे संपन्न झाले.सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान जन्मोत्सव सामाजिक मंडळ उरणचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.


.jpg)


















































































































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)






















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.