मुंबई (प्रकाश चाळके) - आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाच्या गॅससिलेंडरच्या पुरवठ्यात मोठीच टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या लहानसहान कॅटरिंगच्या व्यवसायिक धारकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लहानसहान कँटरिंग व्यवसाय धारकांच्या दक्षिण मुंबई कँटरिंग संस्थेचे अध्यक्ष नितीन कोलगे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज नागरी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या मलबार हिल येथील निवासस्थानी भेट घेतली.
गॅसचे टंचाईमुळे केटरिंग व्यवसायात काम करणारे आणि त्यांचा हातावर पोट असणारे अनेक व्यावसायिक हदबल झाले आहेत. त्यांच्याकडे जेवण पुरवण्याची मागणी होत आहे. परंतु गॅस सिलेंडर नसल्याने त्यांना त्यांची ऑर्डर पूर्ण करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात उपासमारीचे संकट घोंगावत आहे. तरी शासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि लवकरात लवकर गॅस सिलेंडरची उपयोजना करावी अशी माहिती दक्षिण मुंबई केटरिंग संस्थेचे अध्यक्ष नितीन कोलगे यांनी केली असून तसे निवेदन मंत्री महोदय छगन भुजबळ यांच्याकडे दिली. त्यावेळी नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यवसाय गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिष्टमंडळात संतोष शेट्ये स्वप्निल टाकळे, दीपक मोरे, बबन नरे, संतोष नरे, फतेहसिंग गुजर, यशवंत पवार, राजू शिंदे आदी कॅटरिंग व्यवसायिकांचा समावेश होता. मंत्री छगन भुजबळ यांच्या आश्वासनामुळे कॅटरिंग व्यवसायिक धारकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.


.jpg)


















































































































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)




























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.