loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीचे सुपुत्र जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय 'आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड' प्रदान

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रात शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे (ता. सावंतवाडी) येथील युवा जादूगार वैभव रामदास पारकर (कलाक्षेत्रातील नाव – जादूगार वैभव कुमार) यांना पुणे येथील प्रतिष्ठित आर्टबीट्स फाउंडेशनतर्फे 'आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड' या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कला व मनोरंजन विभागात 'कोकणातील उत्कृष्ट जादूगार' म्हणून त्यांची या गौरवपूर्ण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आर्टबीट्स फाउंडेशन ही संस्था गेली २५ वर्षे चित्रकला, शिल्पकला, संगीत, अभिनय आणि लोककला अशा विविध क्षेत्रांतील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. याच प्रतिष्ठित व्यासपीठावर यंदा वैभव कुमार यांच्या जादू कलेची दखल घेण्यात आली. बांदा सारख्या ग्रामीण भागातून आपल्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या वैभव कुमार यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ​जादूगार वैभव कुमार यांच्या सादरीकरणात हिप्नॉटिझम, सस्पेन्स, कॉमेडी आणि नाट्यमयता यांचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. मात्र, त्यांनी आपली कला केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न ठेवता तिचा वापर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केला आहे. 'चमत्कारामागील विज्ञान' उलगडून दाखवत त्यांनी ग्रामीण भागात आणि शाळांमध्ये शेकडो प्रयोग सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाचीही पुरस्कार समितीने विशेष दखल घेतली. ​वैभव कुमार यांना आजवर अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे, ज्यात प्रामुख्याने:​वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड इंटरनॅशनल अवॉर्ड (दिल्ली) ​महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार, ​राष्ट्रीय युवा जादूगार पुरस्कार, ​जादू भूषण व जादू विशारद पुरस्कार, ​महाराष्ट्र शासनाचा बाल वैज्ञानिक विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

​पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना वैभव कुमार म्हणाले, "कोकणातील छोट्या गावातून राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास सोपे नव्हता. ग्रामदेवतेचा आशीर्वाद, कुटुंबाचा पाठिंबा आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे." भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे स्वप्न असून, कोकणात जादूची एक अकादमी सुरू करून ही लुप्त होत चाललेली कला जिवंत ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. ​त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे ओटवणे परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg