loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखचे कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : महाराष्र्ट राज्य कलाअध्यापक संघ महामंडळ व सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या मार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवरुख न्यु इंग्लीश स्कुलचे कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. ४४वी कलाशिक्षण परिषद स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह सातारा येथे पार पडली. यावेळी कलाअध्यापक संघ महाराष्र्ट राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिगंबर मांडवकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्र्ट राज्य, प्रमुख अतिथी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, कलाअध्यापक संघ अध्यक्ष नरेंद्र बारई आदिंसह चंद्रकांत बच्चू पाटील, दादा भुसे, ज्ञानेश्वर म्हात्रे, चंद्रकांत दळवी, कौस्तुभ गावडे, किशोर इंगळे, धनंजय चोपडे उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत व पदाधिकारी तसेच न्यू इंग्लीश स्कुलचे मुख्याध्यापक मधुकर कोकणी तसेच पदाधिकारी, स्टाफ यांनी दिगंबर मांडवकर यांचे विशेष अभिनंदन केले. याआधीही दिगंबर मांडवकर यांना राज्यस्तर, जिल्हास्तरावर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. याबाबत बोलताना मांडवकर यांनी याचे सगळे श्रेय देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे असल्याचे नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg