ठाणे (प्रतिनिधी): ठाण्यातील राबोडी भागातील सरस्वती शाळेची मनमानी फी वाढ, डिजिटलायजेशनच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क, शालेय साहित्य खरेदीत एकाधिकारशाही, एकाच शाळेत तीनदा हजारो रुपयांची प्रवेश फी यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचला. यावेळी केळकर यांनी पालकांच्या समस्या जाणून घेत सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे सांगितले. पालकांनी दिलेल्या निवेदनानुसार शाळा व्यवस्थापनाने आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी कोणतीही पूर्वसूचना न देता फीमध्ये २० टक्के ते ४० टक्के वाढ केली आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली असता, राज्य बोर्डाकडून सीबीएसई बोर्डात रूपांतर होत असल्याने फी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इयत्ता पहिलीची फी ४८ हजार रुपयांवरून थेट ६५ हजार रुपये करण्यात आली आहे. ही फि वाढ मध्यमवर्गीय पालकांसाठी अन्यायकारक आहे.
बोर्ड बदलण्याचा निर्णय घेताना पालकांना विश्वासात घेतले गेले नाही किंवा त्यांच्या आर्थिक क्षमतेचा विचार केला गेलेला नाही, असे पालकांनी सांगितले. बोर्ड बदलाचे कारण सांगून शाळा व्यवस्थापन दरवर्षी तीन ते चार हजार रुपयांची पुस्तके शाळेतूनच घेण्याची सक्ती करत आहे, गणवेशासाठी ठराविक दोनच विक्रेत्यांकडे पाठवले जाते. डिजीटलायजेशनच्या नावाखाली अतिरिक्त फी उकळली जात असल्याची तक्रार पालकांनी केली. जेव्हा पालकांनी या फी वाढीविरोधात निवेदन देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुख्याध्यापकांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आणि तक्रार करणाऱ्या पालकांची व विद्यार्थ्यांची नावे मागितली. यामुळे मुलांना शाळेत त्रास दिला जाईल, अशी भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
याबाबत आमदार संजय केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ठाण्यात सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये या समस्या हजारो पालकांना भेडसावत आहेत. सरस्वती शाळेतील पालकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी आणि शाळेच्या ट्रस्टीशी चर्चा करून पालकांच्या हिताचा निर्णय घेणार आहे. यातून मार्ग निघाला नाही तर शिक्षणमंत्र्यांकडे बैठक लावून पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.


























































































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.