loader
Breaking News
Breaking News
Foto

मंजुरी झाली… पण कामांना ब्रेक! खासदारांनाच विरोध? राजकीय दबावाची चर्चा

जिल्हा नियोजनमधून खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी अडीच कोटी रुपयांची कामे मंजूर झाली. ही मंजुरी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर कामांना वेग येईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रशासकीय मान्यता मिळूनही संबंधित विभागाकडून पुढील कार्यवाहीच होत नसल्याने प्रशासनावर संशयाची सुई फिरू लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड, दापोली आणि खेड या भागातील ही कामे आहेत. विशेष म्हणजे हा परिसर खासदार तटकरे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो. मित्र पक्ष असल्याचे सांगितले जात असतानाही या कामांना अडथळा का आणला जातोय, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.

टाइम्स स्पेशल

प्रशासकीय मंजुरीनंतरही फाईल पुढे सरकत नसल्याने कोणाचा दबाव अधिकाऱ्यांवर आहे का? अशी चर्चा रंगली आहे. संबंधित विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे स्थानिक नागरिकांत नाराजी वाढत आहे. मंजुरी कागदावर आणि कामे ठप्प – हा विरोधाभास नेमका कशासाठी, असा प्रश्न विचारला जातोय. राजकीय वर्तुळात तर यावरून आणखी खळबळ उडाली आहे. मित्र पक्ष असूनही खासदारांनाच विरोध केला जातोय का? प्रशासनावर राजकीय दबाव टाकून कामे रोखली जात आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. जर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg