loader
Breaking News
Breaking News
Foto

वृक्षतोडीस आळा बसणे, काळाची गरज

केळंबे -लाजा (सिराज नेवरेकर) - सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले असून पर्यावरणाचा समतोल ही ढासळला आहे. हे सर्व थांबवण्यासाठी, वृक्ष संवर्धनासाठी वृक्ष तोडीसंर्भातील महाराष्ट्र १९१५ चा वनकायदा लागु करण्यात आला तरच रत्नागिरी जिल्ह्यातील वृक्ष तोडीला आळा बसेल, असे निसर्गप्रेमीतून बोलले जात आहे. बेसुमार झालेल्या वृक्ष तोडीमुळे जंगले नष्ट होऊन हिंस्त्र प्राण्यांची रहाण्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. तसेच भक्ष्याचे प्रमाणातही घट झाली आहे. त्यामुळे बिबट्यांचा भक्ष्यांच्या शोधात नागरी वस्तीत वावर वाढल्याचे दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन घडू लागले आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटे नागरी वस्तीकडे फिरतांना कधी विहीरीत पडून, फारकीत अडकूनतर अज्ञात वाहनांच्या धडकेमुळे बिबट्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा घटना सतत घडतांना दिसून येत आहे. याला एकमेव कारण म्हणजे नियमांचे उल्लंघन करून बेसुमार झाडांची होत असलेली कत्तल असल्याचे बोलले जात आहे. लांजा शहरात सात महीन्याच्या बिबट्याला अज्ञात वाहनांची धडक बसल्यामुळे बिबट्या मृत झाला ही घटना ताजी असली तरी अशा असंख्य प्राण्यांना जीव गमवावा लागत असून संबधित खाते याकडे गांभीर्यपूर्वक पाहील का?असा सवाल या निमित्ताने निसर्ग प्रेमीतून केला जात आहे. होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. दिवसेंदिवस अवलक्षणीय बदल होत आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकरी वर्गाला सतत बसत आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धन होणे ही काळाची गरज बनली आहे. वृक्षतोडीचा महाराष्ट्राचा १९१५ वन कायदा रत्नागिरी जिल्ह्यात लागू करण्यात आलेला नाही. सदर कायदा लागू झाल्यास वृक्ष तोडीस आळा बसेल मात्र कायदा लागू करण्यात आला नाही.

टाईम्स स्पेशल

कायद्याचे उल्लंघन करून नियम धाब्यावर बसून वृक्ष तोड केली जात असल्याने माळराने उजाड झाल्याचे बोलले जात आहे. लांजा तालुक्यात सर्वाधिक लाकुड तोड होत असल्याचे बोलले जात आहे. अधिकारी वर्गाकडून गांभीर्यपूर्वक लक्ष न दिले गेल्यामुळे जंगलतोड सुरूच असून सर्वांना समान न्याय या भूमिकेतून कार्यवाही होत नसल्याची नाराजीही व्यक्त केली जात आहे. तसेच सात बाराला वृक्षलागवडची नोंद घालताना सहहीस्सेदारांची संम्मती लागते शिवाय लाकुड तोडीचा परवानाही सहजासहजी मिळत नाही, असे असतानी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड तालुक्यात होत असल्याने आश्चर्य असल्याचे निसर्गप्रेमींतून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे वृक्ष तोडीस आळा बसणे ही काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg