loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख येथे रांगोळी कलाकारांनी अंधश्रद्धा विषयावरती काढलेल्या रांगोळ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले

देवळे (प्रकाश चाळके) - जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल देवरुख येथे राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा मुंबई येथील कलाकारांनी भाग घेऊन दैनिक रत्नागिरी टाइम्सची विशेष रांगोळी काढली आहे. मुंबईतील भांडुप येथील रांगोळी कलाकार अभिषेक आनंद सुतार यांनी काढलेली रत्नागिरी जिल्ह्याचे मुखपत्र रत्नागिरी टाइम्स ही रांगोळी सर्वांची लक्ष वेधून घेत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवरुख येथे भरवलेल्या या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेमध्ये मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यातून रांगोळी कलाकारांनी भाग घेतला होता. यामध्ये मुख्यतः मनोज आनंद सुतार भांडुप मुंबई, मनोज नारायण चव्हाण कर्जत मुंबई, केदार सखाराम टेमकर कुडाळ सिंधुदुर्ग, अक्षय शिवाजी वाहाळकर देवरुख, विलास विजय रहाटे देवरुख या कलाकारांच्या रांगोळ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून भांडुप येथील मनोज सुतार यांच्या रांगोळीने वेगळीच रंगत आणली होती. या कलाकारांनी काढलेल्या रांगोळ्या प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक सदर रांगोळी स्पर्धा प्रदर्शन उद्या १० वाजेपर्यंत रसिकांना पाहण्यास खुली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg