पनवेल : तालुक्यातील वलप ग्रामपंचायतच्या पोर्टलवरील युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून २ हजार ६६० बनावट जन्म नोंदणीप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली. आदर्श दुबे (बिहार), ताबीज अजगर अली (बिहार) आणि प्रसून कुमावत (मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी प्रसून न्यायालयात हजर केले असता ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
३० सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ३८ दिवसांत वलप ग्रामपंचायतीच्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर अनोळखी व्यक्तींनी करून २ हजार ६६० बनावट जन्म नोंदणी तयार केली. त्याचा वापर मतदान ओळखपत्र आणि इतर शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ग्रामसेविकेने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली.
आदर्श दुबे आणि ताबीज अजगर अली यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली तर प्रसन्न कुमावत याला ३० मार्चला यवतमाळ कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून पाचशे ते १ हजार रुपयात जन्म नोंदणीचे प्रमाणपत्र अनेकांना देण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ते करण्याचे काम वलप ग्रामपंचायतीकडून सुरू आहे. या २ हजार ६६० बनावट जन्म नोंदणी पत्रांचा वापर कुठे झाला आहे आणि यात आणखी कोण सहभागी आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

















































































































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)























































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.