loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाणखवटी येथे ११ आणि १२ एप्रिलला 'श्री देवी सोमजाई' जत्रोत्सवाचा भव्य भक्ती सोहळा

खेड (दिलीप देवळेकर) - बहीण-भावांच्या पालखी भेटीचा रंगणार अविस्मरणीय सोहळा; गृह राज्यमंत्री योगेश कदम, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची प्रमुख उपस्थिती. निसर्गरम्य कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गाव दिवाणखवटी नगरीचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सोमजाई देवीचा भव्य आणि दिव्य जत्रोत्सव सोहळा शनिवार, दि. ११ एप्रिल आणि रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी श्री देवी सोमजाई ग्रामस्थ दिवाण खवटी आणि सोमजाई देवी ग्रामस्थ मंडळ (मुंबई, ठाणे, पुणे)यांच्या वतीने पूर्ण झाली आहे. या जत्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्री आई सोमजाई देवी (दिवाणखवटी) आणि श्री देव केदारनाथ (खवटी) या बहीण-भावांच्या पालख्यांची पारंपरिक आणि भावपूर्ण भेट! हा डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक गर्दी करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय श्री देवी वाघजाई-कलमजाई (तळे), श्री देवी भैरी कोटेश्वरी (आंबये), श्री देव वाघोबा (ऐनवरे) आणि श्री देवी झोलाई केदारनाथ (हेदली) या मानाच्या व निमंत्रित पालख्याही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. शनिवार, ११ एप्रिल: सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गावभर लाट फिरवणे, रात्री १० वाजता लाट पूजन व उभारणी, रात्री १०:३० वाजता सर्व निमंत्रित पालख्यांचे वाजत-गाजत आगमन होईल. त्यानंतर रात्री ११ वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडेल. रात्री ११:३० वाजता मुंबईच्या प्रसिद्ध ‘साईराज स्वरसम्राट’ संचाचा भव्य करमणूक व मनोरंजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. रविवार, १२ एप्रिल: पहाटे ४ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा होईल. दुपारी २:३० वाजता चौकपूजन व मुख्य लाट सोहळा पार पडेल. त्यानंतर दुपारी ३:३० वाजता निमंत्रित पालख्यांना भावपूर्ण निरोप देऊन जत्रोत्सवाची सांगता होईल.

टाईम्स स्पेशल

या भव्य सोहळ्याला महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेशदादा रामदास कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणार आहेत. तरी या मंगलमयी जत्रोत्सवाचा आणि पालखी भेटीच्या अलौकिक सोहळ्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन दिवाणखवटी ग्रामस्थ आणि सोमजाई देवी ग्रामस्थ मंडळ मुंबई, ठाणे, पुणे मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg