loader
Breaking News
Breaking News
Foto

गोव्यातील मोपा परिसरातील कडशी भागात ‘ओंकार’ हत्तीचा पुन्हा एकदा धिंगाणा

बांदा (प्रतिनिधी) - गोव्यातील मोपा परिसरातील कडशी भागात ‘ओंकार’ हत्तीने पुन्हा एकदा धिंगाणा घातला आहे. रविवारी मोपा परिसरात दाखल झालेल्या या हत्तीने सोमवारी सकाळी कडशी–मोपा परिसरात फिरत असताना शेतातील संरक्षण भिंती, बागायती पिके तसेच विविध साहित्याची नासधूस केली. याचवेळी हत्तीने मोपा कडशी येथील उमेश गाड यांच्या चारचाकी वाहनाचे नुकसान केले. तसेच एक दुचाकीही फोडल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही सप्टेंबरपूर्वी ‘ओंकार’ हत्तीने पेडणे तालुकामधील तांबोसे, उगवे, तोरसे व वारखंड या भागात प्रवेश करून शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर महाराष्ट्र वन विभाग यांनी या हत्तीला दोडामार्ग परिसरात त्याच्या कळपात सोडले होते. मात्र काही दिवसांपासून हा हत्ती पुन्हा सीमा भागात फिरताना दिसत असून शेतीची नासधूस करत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी गोवा वन विभाग चे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी त्याच्या मागावर आहेत. गोवा वन विभागाकडून हत्तीला महाराष्ट्राच्या दिशेने हाकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी महाराष्ट्रातील अधिकारी व स्थानिक शेतकरी हा हत्ती आपल्या हद्दीत घेण्यास तयार नसल्याचा आरोप गोव्यातील नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून या हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पाण्याच्या शोधात फिरताना ‘ओंकार’ हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून हत्तीप्रेमी कासावीस झाले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg