loader
Breaking News
Breaking News
Foto

नसरापूर येथील पीडित मुलीवर झालेल्या निर्घुण हत्याप्रकरणी पोलीस मित्र सुरक्षा परिषदेकडून निषेध

कर्जत (प्रतिनिधी) - पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील पीडित चार वर्षीय मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचार व निर्घुण हत्याचा पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या वतीने जाहीर निषेध केला असून या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, अशी मागणी करण्यात आली. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मात्र, या अश्या नराधमांमुळे लहान मुलीचे रक्षण, महिलांचे रक्षण, यामुळे महिला तरुणी सुरक्षित आहेत का नाही? यावर मुद्दा उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अशा निर्दयी घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मोठी पावले उचलण्याची आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात अशा अत्याचाराच्या घटना घडू शकणार नाहीत. यावर आज महाराष्ट्र राज्य सरकारचे ना. मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक सदानंद दाते, यांना तसेच कर्जत पोलिस ठाण्याच्या डी.वाय.एस.पी.राहुल गायकवाड यांना एक लेखी निवेदन सुपूर्द करण्यात आले. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर साळोखे यांनी म्हटले की आपल्या सगळ्यांना असे वाटते की, अशा नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे. पण तसे लोकशाहीत करता येत नाही. पण कुणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, या नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न राज्य शासनाचा असेल, राज्य शासनाने हे प्रकरण हायकोर्टाच्या माध्यमातून फास्टट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून जलद गतीने मार्गी लावले पाहिजे.

टाइम्स स्पेशल

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे म्हणाले,"घटना गंभीर आहे. रोष देखील साहाजिक आहे. नागरिकांचा रोष असणे काही चुकीचे नाहीये त्यामुळे त्या नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या वेळी संघटनेच्या वतीने पोलिस ठाण्यात कर्जत डी.वाय.एस.पी. यांना निवेदन देण्यात आले असून ते निवेदन महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य सरकारचे पोलिस महासंचालक यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष समाज भूषण सचिन बुवा लोंगले, समाज भूषण जैतू बुवा कराळे, महिला युवक अध्यक्षा प्राची जाधव, युवक अध्यक्ष कर्जत सुरज चव्हाण, भाजप कार्यकर्ते दर्शन कांबरी, पोलिस पाटील गणपत वाघमारे व अन्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg