loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे पागडेवाडी येथील श्री साई मंदिराचा दि.७ मे रोजी २६ वा वर्धापन दिन सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे (कोंडवाडी) पागडेवाडी येथील श्री साईनाथ मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापूजा व श्री साई मंदिराचा २६ वा वर्धापन दिन सोहळा श्री साई मंदिर, पाटपन्हाळे (कोंडवाडी) पागडेवाडी येथे गुरुवार दि. ०७ मे २०२६ रोजी विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार दि. ७ मे रोजी पहाटे ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ९ ते १० वा. साई मुर्तीचा अभिषेक, सायं. ३ ते ५ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सायं. ५ ते ६ वा. महाआरती, सायं. ६ ते ८.३० वा.साई भंडारा (महाप्रसाद), रात्रौ ८.३० ते ९.३० वा.सुस्वर भजन, रात्रौ ९.३० ते १०.३० वा. विद्यार्थी सत्कार समारंभ, रात्रौ १०.३० वा. जय वाघेश्वरी नमन नाट्य निकेतन, वहाळ गावकरवाडी, ता. चिपळूण यांचे कोकणचे बहुरंगी नमन गवळणींच्या शृंगारासह पेंद्या आणि मावशीची जुगलबंदी, वगनाट्य : सोनपूर नगरावर दरोडा तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुंबई अध्यक्ष प्रकाश कृष्णा पागडे, ग्रामीण अध्यक्ष रघुनाथ राघो पागडे, मुंबई सेक्रेटरी मंगेश गुणाजी पागडे, ग्रामीण सेक्रेटरी गणपत सोनू पागडे, मुंबई खजिनदार सतिश शंकर पागडे, ग्रामीण खजिनदार विकास गोपाळ पागडे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

विविध कार्यक्रमाचे आयोजन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg