ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाचा घबाड आढळून आला आहे. या कारवाईत पोलिसांनी १०७ किलो गांजासह मुलुंड, ठाणे आणि भिवंडीमधील एका त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्या तिघांवर यापूर्वीही अंमली पदार्थसंबंधित गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात समोर आली असून न्यायालयाने त्यांना ९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशान्वये अंमली पदार्थविरोधी पथक गस्तीवर असताना ४ मे रोजी दुपारी २.०५ वाजण्याच्या सुमारास वाडेघर, डम्पिंग ग्राउंडजवळ संशयास्पद हालचाल करणारे तिघे आढळले. त्यांच्या जवळ हिरव्या-पांढऱ्या रंगाच्या गोण्या दिसल्याने पोलिसांनी चौकशीसाठी पुढे जाताच ते पळण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी तत्परतेने त्यांना ताब्यात घेतले. अटक आरोपींमध्ये भिवंडीमधील वसीम नुरूजमा खान उर्फ पिला (३०), ठाणे, वागळे इस्टेट येथील दिनेशकुमार सजीवन सरोज (२७) आणि मुलुंडमधील मोहित मेवालाल वर्मा (२०) यांचा समावेश आहे.
त्यांच्या घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्या ताब्यातून १०७ किलो ५० ग्रॅम गांजा, १० हजार ५०० रुपये रोख आणि ४१ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण २१ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी वसीम याला घाटकोपर युनीट ७ अटक करून त्याच्याकडून २.५ किलो चरस जप्त केला होता. तर दिनेश याला त्याच पथकाने अटक करून त्याच्याकडून १८२० किलो गांजा जप्त केला होता. तसेच मोहित याला मुलुंड पोलिसांनी एनडीपीसी गुन्ह्यात अटक केल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई परिमंडळ ३ कल्याण विशेष पथक आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्तरीत्या केली आहे.









































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.