loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वांनी एकसंधपणे काम करून वैभववाडीतील गावागावात पुन्हा शिवसेना उभी करूया - वैभव नाईक

वैभववाडी (प्रतिनिधी) - शिवसेना संघटना अडचणीत असल्यामुळे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. आपल्या सारख्या असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज संघटना टिकून आहे. सत्तेसाठी काहीजण आपल्यातून गेलेत परंतु शिवसैनिक आणि सामान्य जनता आपल्यासोबत आहे. त्यांना विश्वास देण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. सर्वांनी एकसंधपणे काम करून युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडीतील गावागावात पुन्हा एकदा शिवसेना उभी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. ज्या ज्या ठिकाणी माझी गरज लागेल त्यावेळी जिल्हाप्रमुख म्हणून आपल्या पाठीशी मी खंबीरपणे राहणार आहे असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी वैभववाडी येथे बोलताना दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबाद! बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो! वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशी घोषणाबाजी करण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जि. प. निवडणुकीत वैभववाडीमधील आपल्या निष्ठावंत उमेदवारांनी आलेली आमिषे जुगारून चांगली लढत दिली. आज विजय मिळाला नसला तरी उद्याच्या विजयासाठी आतापासून शिवसेना संघटना वाढविली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मेहनत घेणे गरजेचे आहे. शिवसेनेत युवा वर्गाची चांगली फळी निर्माण केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका संघटक राजू रावराणे, तालुका संघटक गुलझार काझी, माजी तालुकाप्रमुख अशोक रावराणे, सोशल मीडिया प्रमुख विठोबा गुरव, अनिल नराम, अनंत नांदलकर, दीपक चव्हाण, पंढरीनाथ सुर्वे, रविंद्र रावराणे, संतोष पाटील, मयूर सुर्वे, संतोष जाधव, रंजित रावराणे, प्रकाश धोंड, समीर लांजेकर, संदीप कोलते, प्राची कोलते, कल्याणी शिंदे, जगन्नाथ शिंदे, स्वप्नील रावराणे, सुर्यकांत परब, राजेश तावडे आदि शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg