loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात अवैध दारूसह प्रवासी रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात ; ७५ बाटल्या जप्त

ठाणे (प्रतिनिधी) - पोलिसांच्या ससेमिऱ्याने धस्तावलेले गांजा तस्कर विविध युक्त्या लढवीत गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिसांच्या सतर्कतेमुळे गांजा तस्करांचे मनसुबे उध्वस्त करण्यात येत आहेत. ट्रॉली बॅगेतून गांजाच्या तस्करीची घटना ताजी असताना पुन्हा ठाणे रेल्वे स्थनकावर ट्रॉली बॅगेतून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या ओडिशातील राजीव रविंद्रनाथ पात्रा (वय ४९) या एका प्रवाशाला अटक केली. त्याच्याकडून ७५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती व. पो. नि. अर्चना दुसाने यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे शिपाई नागनाथ रेपाळ यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना एक इसम दोन ट्रॉली बॅगसह संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये ब्ल्यू अँड गोल्ड कंपनीच्या ७५० मिलीच्या ७५ सीलबंद दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त मद्याची किंमत ११ हजार २५० रुपये आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत राजीव पात्रा याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार डी. व्ही. राठोड करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg