loader
Breaking News
Breaking News
Foto

​कोकणात 'डोंगरी हापूस' ची मोठी उलाढाल; दापोलीच्या ग्रामीण भागात बागायतदारांची लगबग

दापोली (​सागर गोवळे) - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यासह कोकणच्या ग्रामीण भागात सध्या 'डोंगरी हापूस' आंब्याचा हंगाम जोरात सुरू झाला असून बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळत आहे. विशेषतः बोरिवली, आडी वाडी, कोळथरे आणि पंचनदी या परिसरातील ग्रामीण भागातून आंब्याची मोठी आवक सुरू झाली आहे. यंदा बागायतदारांनी आंब्याच्या गुणवत्तेवर आणि सादरीकरणावर विशेष भर दिला आहे. झाडावरून उतरवलेला आंबा थेट न विकता, त्याची साईज आणि प्रतवारी (Grading) केली जात आहे. वेगवेगळ्या साईज निवडून त्याचे सुटसुटीत बॉक्स तयार करण्यावर भर दिला जात आहे, ज्यामुळे ग्राहकांना आपल्या बजेटनुसार आंबा खरेदी करता येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाजारपेठेत सध्या आंब्याच्या पेटीचे दर साईज आणि दर्जानुसार ठरवले जात आहेत: ​दोन डझनाची पेटी: १२००, १५०० ते २००० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. ​एक डझनाची पेटी: ५०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. पंचनदी आणि कोळथरे परिसरातील डोंगराळ भागातील आंब्याला चव आणि गोडीमुळे मोठी मागणी असते. सध्या हा आंबा मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे रवाना होण्यासोबतच स्थानिक नाक्यांवरही विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. वाढत्या उन्हामुळे आंबा लवकर तयार होत असून, विक्रीचा वेग वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg