loader
Breaking News
Breaking News
Foto

पानवल येथे श्री सांब जुगाई पुरातन देवस्थानच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा

रत्नागिरी - पानवल येथील ग्रामदेवता श्री सांब जुगाई पुरातन देवस्थानाच्या मंदिराचे नियोजित काम पूर्ण झाले असून मंदिराचा कलशारोहण सोहळा शुक्रवार दि. ०८ मे २०२६ रोजी पानवल शिंदेवाडी येथे श्री.प.पु.सदानंदगिरी महाराज, मठाधिपती गगनगिरी महाराज आश्रम बुरंबाळी यांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ०७/०५/२०२६ रोजी सायं. ०५ वाजता कलश मिरवणूक (घवाळीवाडी ते शिंदेवाडी), शुक्रवार दि. ०८/०५/२०२६ रोजी सकाळी ०७.३० वा. पुजा, सकाळी ०८.०० वा. होमहवन, पुर्णाहूती अभिषेक, सकाळी ११.०० वा. कलश पूजन, सकाळी ११.५५ वा. कलशारोहण सोहळा, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी ०१ ते ०३ वा. महाप्रसाद, दुपारी ०३ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ०५ ते ०७ तिर्थप्रसाद व हळदीकुंकू, रात्री ०७ ते ०९.३० महाप्रसाद, रात्री १० वा. मान्यवरांचे आभार व पानवल घवाळीवाडी यांचे बहुरंगी नमन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन शर्मद प्रकाश मुळ्ये (खोत), भिकाजी विठ्ठल घवाळी (गावकर), शंकर नारायण लिंगायत (पुजारी), प्रभाकर पांडुरंग मांडवकर (मानकरी), दिपक शंकर तांबे (मानकरी) तसेच समस्त ग्रामस्थ पानवल घवाळीवाडी, शिंदेवाडी यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg