संगलट खेड(इक्बाल जमादार) - गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य सरकारने हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. यामुळे १५ मे रोजी गिरगांव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थान असा आंबा उत्पादकांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी केली. या मोर्चाला ठाकरे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसनेही जाहीर पाठींबा दिला आहे. 'हवामान बदलाचा फटका, आता सरकारला बसणार आंदोलनाचा झटका' या टॅगलाईन खाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व राजू शेट्टी करणार आहेत, भिक नको, हक्क हवा... आंबा उत्पादकांना न्याय हवा. कोकणातील आंबाउत्पादकांना घामाचे योग्य दाम मिळण्यासाठी हा मोर्चा होणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी संकटात सापडल्यानंतर मदतीसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून उद्योगपतींची कर्जे माफ करण्याचा सपाटा लावला आहे, शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडले आहे. आंबा उत्पादक, काजू उत्पादक व मत्स्य शेतकरी हा कोकणचा कणा आहे. कोकणातील हे तीनही मुख्य शेतकरी सध्या संकटात आहे. चालू वर्षीचा आंबा हंगाम मोहोर गळती अवकाळी पाऊस, तापमानातील चढ उतार, फळमाशीचा प्रादुर्भाव, वाढता किटकनाशकांचा खर्च या सर्व घटकामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आंबा संशोधन, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ मधील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र राज्यातील कृषी, फलोत्पादन मत्स्य विभागाने सर्व उपाययोजना कागदावर केलेल्या आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. १५ मे रोजी गिरगांव चौपाटी येथून सायंकाळी ४ वाजता मोर्चा वर्षा निवासस्थानाकडे काढण्यात येणार आहे. यात ठाकरे शिवसेना, मनसे राष्ट्रीय कांग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह इतर संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.









































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.